विमा सखी योजना : महिलांसाठी नवीन संधी, दरमहा मिळवा ७ हजार रुपये.

Bima Sakhi Yojana 2025

आपल्या भारत देशातील महिलांचे आर्थिक विकास, सशक्तीकरण होणे हे देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचे आहे. म्हणून केंद्र आणि राज्य सरकारे वेळोवेळी वेगवेगळ्या योजना आणतात. अशाच एक महत्त्वच्या योजनेचे नाव म्हणजे विमा सखी योजना या योजनेअंतर्गत १० वी उत्तीर्ण महिलांना दरमहा ७००० रु मिळवण्याची संधी मिळणार आहे.या योजनेच्या मध्येयमातून महिलांना रोजगार, प्रशिक्षण आणि कमिशनच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळेल.

विमा सखी योजना म्हणजे काय? ( on click )

LIC ( Life Insurance Corporation ) अंतर्गत सुरु करण्यात आली असून महिलांना विमा एजंट म्हणून संधी दिली जाते.महिलांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्या इतरांना विमा पॉलिसी विकून स्वतःचे उत्त्पन्न वाढवू शकतात.

योजनेची पात्रता आणि अटी :

  • अर्जदार महिला १० वी उत्तीर्ण असावी.
  • वय १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे.
  • महिला ग्रामीण किंवा शहरी भागातील असू शकतात.
  • विमा एजंट म्हणून काम करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती असणे आवशयक आहे.

योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • १० वी प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज करण्याची प्रक्रिया :

या योजनेसाठी इच्छुक महिलांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. किंवा जवळच्या एलआयसी कार्यालयात  जाऊन अर्ज सादर करावा लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया :-

https://yojanagadi.inhttps://yojanagadi.in/

  • सर्वप्रथम, विमा सखी योजनेसाठी LIC च्या अधिकृत वेबसाईटला ( https://licindia. in) भेट द्या.
  • होमपेजवर  “विमा सखी योजना” किंवा Insurance Agent Registration असा पर्याय शोधा.
  • त्यानंतर Apply Now किंवा Registration या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार क्रमांक आणि वयाची माहिती भरा.
  • आता आवश्यकते कागदपत्रे अपलोड करा आधार कार्ड, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र,रहिवासी प्रमाणपत्र,बँक खाते तपशील आणि पासपोर्ट साईज फोटो
  • फॉर्म सबमिट करा आणि ओटीपी व्हेरिफाय करा – फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल ओटीपी टाकून तुमची नोंदणी पूर्ण करा.
  • फॉर्म सबमिट  झाल्यानंतर तुम्हाला एक एप्लीकेशन आयडी मिळेल त्यावरून तुमचे तुम्ही एप्लीकेशन स्टेटस चेक करू शकता,त्यानंतर फॉर्म मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एलआयसी ऑफिस कडून कळवण्यात येईल प्रशिक्षण देण्यात येईल.

महिन्याला ७००० रु कसे मिळतील?

  • पहिल्या वर्षी – ७००० रुपये प्रति महिना
  • दुसऱ्या वर्षी – ६००० रुपये प्रति महिना
  • तिसऱ्या वर्षी – ५००० रुपये प्रति महिना
  • याशिवाय प्रत्येक विमा पॉलिसी विक्रीवर कमिशन मिळेल.

2 thoughts on “विमा सखी योजना : महिलांसाठी नवीन संधी, दरमहा मिळवा ७ हजार रुपये.”

Leave a Comment