तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाईन चेक करा.|Traffic Challan Check

तर नमस्कार मित्रांनो,आपण आपली चार चाकी गाडी किंवा दुचाकी घेऊन कुठं बाहेर गेलो असेल आणि आपली गाडी सिग्नल किंवा नो पार्किंग मध्ये उभी असेल किंवा काही वाहतुकीचे नियम आपण तोडले असतील तर आपल्या गाडीवर ऑनलाईन दंड Traffic challan check रेकॉर्ड केला जातो. आपल्या गाडीला काही दंड भरावा लागणार आहे का? दंड असेल तर तो किती आणि कुठे भरायचा आहे? यासंबंधीची सर्व माहिती आपण आज या लेखामध्ये आपण बघणार आहोत.

जर तुमच्याकडे दुचाकी किंवा चार चाकी किंवा कोणत्याही वाहन असेल तर तुमच्या वाहनावर लावला जाणारा कोणत्याही प्रकारचा दंड आणि त्याची जाणीव असणे आवश्यक आहे. असे कोणत्याही प्रकारच्या वाहना वरील दंड तपासण्यासाठी वाहतूक पोलीस स्टेशन किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओ ला भेट द्यावी लागत असे. परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वाहनावरील दंड तपासणे ट्राफिक चलन चेक मुळे अगदी सोपे झाले आहे.

ई – चालान कसं तपासतात? How to pay E- Challan: https://yojanagadi.in/land-calculated-on-mobile/

  • हे काम तुम्ही घरी बसून करू शकता.
  • यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या ई चालान ( E-Challan ) वेबसाईटवर जावं लागेल. किंवा परिवहन विभागाचे अँप डाउनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर चेक ऑनलाईन सर्व्हिसेस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Check challan Status वर क्लिक करा.
  • त्यानंतर तिथे तुमच्या वाहनाचा नंबर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकून ई – चालान एसएमएसद्वारे SMS मिळविण्यासाठी पर्यायावर क्लीक करा.
  • जर तुम्हाला कोणत्याही चालान मेसेज आला नाही तर DL किंवा Vehicle Number चा पर्याय निवडा.
  • तिथे विचारलेली माहिती भरा आणि Get Details वर क्लिक करा.
  • तुमच्या वाहनाच्या नावे जर एखाद चालान पेंडींग असेल तर तुम्हाला त्याची डिटेल्स मिळतील.

त्या खाली तुम्हला Pay Now  चा पर्याय दिसेल. ते निवडून, नेट बँकिंग, क्रीडीट कार्डद्वारे पेमेंट केले जाऊ शकते.

टीप – ट्राफिक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुमचे इ – चलन कापले गेले तर ते तुम्हाला 60 दिवसांच्या आत भरावे लागेल. काही कारणास्तव इ -चलन भरले नाही,तर सरकार किंवा पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाते.

1 thought on “तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाईन चेक करा.|Traffic Challan Check”

Leave a Comment