
शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( PM KISAN ) योजना ही केंद्र सरकारकडून फक्त देशातील शेतकरी वर्गासाठी राबविण्यात येणारी एक महत्वकांशी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. परंतु राज्यातील काही पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचे हप्ते मिळणे बंद झाले आहेत. म्हणूनच आपण या पोस्टमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते बंद का झाले आहेत? त्याचबरोबर सदरचे हप्ते पुन्हा सुरु कसे करायचे? याबाबातची संपूर्ण माहिती पाहूया.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( PM KISAN ) योजनेविषयी थोडक्यात..
अल्प व सीमांत भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राज्यांमध्ये 1 डिसेंबर 2018 पासून राबवण्यास सुरुवात केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे हा आहे. सुरुवातीला या योजनेअंतर्गत 2 हेक्टर पर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये चार महिन्याच्या अंतराने बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाते.
नंतर केंद्र सरकारने या योजनेचे निकष शिथिल करून सुरुवातीला 2 हेक्टर शेत जमिनीची अट रद्द करून सरसकट सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असल्याचे घोषित केले. वरील निकषेतील केल्यामुळे या योजनेसाठी लाभार्थी शेतकरी संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 19 हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे. 20 वितरण मान्सून हंगामासाठी केले जाण्याची शक्यता आहे.जेणेकरून शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनापूर्वी शेत जमिनीची कामे करण्यासाठी त्याचबरोबर बी-बियाणे,खते खरेदी करण्यासाठी या पैशाची मदत होईल.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( PM KISAN ) योजनेचे हप्ते बंद होण्याची कारणे –
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वितरित करण्यात येणारे हप्ते काही पात्र लाभार्थ्यांना मिळणे बंद झाले आहेत हे होते बंद का झाले आहेत? याची कारणे आपण खाली पाहूया :
- लाभार्थ्याने ई- केवायसी ( e – KYC ) केलेली नसेल तर, त्याला या योजनेअंतर्गत देण्यात येणारे हप्ते बंद होतात.
- लाभार्थ्याच्या बँक खात्याला त्याचे आधार कार्ड लिंक नसणे.
- लाभार्थ्याचे बँक खाते DBT सक्षम नसणे.
- लाभार्थ्याना आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते बंद असणे.
- लाभार्थ्याच्या बँक खात्याला दुसऱ्या कुणाचे तरी आधार कार्ड लिंक असणे.
- पीएम किसानसाठी नोंदणी केल्यानंतर आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करणे.
- जमिनीचे प्रामाणिकरण नसणे.
- नोंदणी केल्यानंतर जर लाभार्थ्यानी आयकर भरलेला असेल तर.
- लाभार्थ्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ नाकारलेला असेल तर.
- विविध कारणास्तव अर्ज अपात्र झाला असेल तर.
- पीएम किसानसाठी नोंदणी केल्यानंतर जर लाभार्थ्यानी जमीन विक्री केली तर तो भूमिहीन होतो या कारणांमुळे या योजनेचे हप्ते बंद होतात.
- लाभार्थी मयत झाल्यामुळे या योजनेसाठी तो अपात्र होतो त्यामुळे या योजनेचे हप्ते येणे बंद होतात.
या वरील सर्व कारणाने पीएम किसान योजनेचे हप्ते बंद होतात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( PM KISAN ) योजनेचे हप्ते पुन्हा कसे सुरु करायचे?
वर दिलेल्या अनेक कारणांमुळे जर तुमचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते बंद झाले असतील तर, तुम्ही खालील दिलेले उपाय करून सदर योजनेचे हप्ते पुन्हा सुरू करू शकता.
- महसूल विभागाशी स्वत: संपर्क करून जमिनीचे प्रमाणीकरण करून घेणे.
- स्वत: सीएससी किंवा गावातील कृषी सहाय्यक यांच्या मार्फत ई केवायसी (e -KYC )करून घेणे.
- जर तुमचे बँक खाते आधार कार्ड ला लिंक नसेल तर ते करून घेणे.
- नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन DBT Enable ( सक्षम ) खाते उघडणे.
- आधार कार्ड ला लिंक असलेले बँक खाते बंद असेल तर बँक खाते सुरू करून घेणे.
- तुमच्या बँक खात्याला जर दुसऱ्या कोणाचा आधार नंबर लिंक असेल तर सदरच्या बँक मध्ये जाऊन दुरुस्ती करून घेणे.
- पी एम किसान नोंदणीनंतर जर तुम्ही आधार मध्ये दुरुस्ती केली असेल तर सी एस सी मार्फत आधार पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करून घेणे.
- जर तुम्ही नोंदणी केल्यानंतर आयकर भरला असाल तर तुमचा अर्ज अपात्र केला जातो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे पी एम किसान चे हप्ते कायमस्वरूपी बंद होतात.
- जर तुम्ही स्वत: या योजनेचा लाभ समर्पित केला असाल तर,परत या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही.
- जर तुम्ही पी एम किसान साठी पात्र असूनही अपात्र घोषित केले असेल तर,सर्व आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला मध्ये जाऊन अपात्रता मागे घेण्याबाबत अर्ज करणे.
- लाभार्थी मयत झाल्यामुळे त्याचबरोबर नोंदणीनंतर जर लाभार्थी जमिनीची विक्री केल्यानंतर तो जर भूमहीन होत असेल तर अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- बँकेकडून जर आर्थिक व्यवहार नाकारले असतील तर लाईफ मध्ये जाऊन चौकशी करून ज्यात काही त्रुटी असतील त्या दूर करणे.
अशा पद्धतीने तुम्ही पीएम किसान योजनेचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करू शकता.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिक माहितीसाठी आम्ही कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तथा तालुका नोडल अधिकारी पीएम किसान यांच्याशी संपर्क साधू शकता.