तुमच्या शेत जमिनीची मोजणी करा  ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरच…

Land Measurement On Mobile

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. येथे शेतीची जमीन ही कधी सरळ तर कधी वाकडी तिकडी असते, वर खाली, ओबाड धोबड असते. त्यामुळे जमिनीची मोजणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असतात. कधी कधी तर जमीन मोजता शेतीला लागून शेती असणारे दोघ शेतकऱ्यांची भांडण देघील होत आसता. आशा परस्तितीत कायदेशीररित्या जमीन मोजणी करायची असल्यास शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे मोजणी अर्ज करावा लागतो. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून ठरविण्यात आलेल्या दारानुसार एकरी रक्कम भरावी लागते. यामुळे काही वेळा आर्थिक अडचणीमुळे बरेच शेतकरी माघार घेत असतात.आणि जमीन मोजणी राहून जाते.

     शेत जमीन मोजणी ऑनलाईन आपल्या मोबाईलवर या बद्दल माहिती देण्याचा उद्देश म्हणजे शेतकरी आणि भूमिहीन व्यक्तींना जमीन संबंधित माहिती सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध करणे. पारंपरिक पद्धतींमध्ये शेत जमीन मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कार्यालयांमध्ये फिरावे लागे, कागदपत्रांची तपासणी करावी लागे आणि त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो. मात्र, ऑनलाईन पद्धतीने शेत जमीन मोजणी करण्यामुळे या सर्व अडचणी दूर होतात.आजकाल डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे आणि राज्य सरकारे विविध ऑनलाइन पोर्टल्स आणि apps सुरू करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची माहिती थेट मोबाईलवर किंवा संगणकावर उपलब्ध करून देत आहेत. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या नकाशासोबतच त्यावर असलेल्या विविध कागदपत्रांची माहिती थेट मिळवता येते. यामध्ये भूगोल, सीमारेषा, माप, जमीन नोंदी, आणि त्या संबंधित अधिकारांची माहिती देखील समाविष्ट आहे.

   हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना नॅशनल डिजिटल लँड रेकॉर्ड (NDLR) किंवा राज्य शासनाच्या भूविवरणी प्रणालींना जोडले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना सहजपणे त्यांच्या जमिनीची मोजणी, तपासणी, आणि अधिकारांचे प्रमाणीकरण करता येते. यामुळे कागदी प्रक्रिया कमी होऊन भ्रष्टाचार आणि त्यासंबंधित अडचणी कमी होतात. तसेच, शेतकऱ्यांना जमीन विक्री किंवा खरेदी करतांना कोणतेही वाद विवाद टाळता येतात.शेत जमीन मोजणी ऑनलाईन पद्धतीचा दुसरा महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे डिजिटल साक्षरतेला चालना देणे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अधिक सक्षम आणि माहितीपूर्ण बनवते, जे त्यांच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा करते.

मोबाइलद्वारे जमीन मोजणी कशी करावी…

  • सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये play store open करा.
  • त्यानंतर त्या ठिकाणी Google Map Calculator हे ऍप उघडा.
  • तुमच्यासमोर संपूर्ण नकाशा दाखवला जाईल, त्या ठकाणी तुमचे राज्य, जिल्हा आणि तालुका टाकुन सर्च करा.
  • तुमच्या जवळील नकाशा आल्यानंतर आता तुमच्या जमिनीच्या चारी बाजू कोपऱ्यानी सिलेक्ट करा.
  • आता तुम्ही जमीन मोजणीसाठीचे परिणाम निवडून अगदी तंतोतंत जमिनीची मोजणी करू शकता.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे जमीन मोजताना Square Feet किंवा Square Meter या परिणामणाची निवड करा.
  • आशा पद्धतीने तुम्ही तुमची जमीन हेक्टरमध्ये सुद्धा मोजू शकता.