लाडक्या बहिणींना आता मिळणार मोफत सूर्यचूल अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण माहिती! Free Solar Stove Scheme

नमस्कार, आजच्या या लेखामध्ये लाडक्या बहिणींना मोफत सूर्यचूल मिळणार आहे त्या बदल सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी योजनेची माहिती,ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्या साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती आपण सविस्तर पणे जाणून घेऊया.

सूर्यचुली विषयी थोडक्यात माहिती :-

सूर्यचूल ही आधुनिक सोलर कुकिंग सिस्टिम आहे. सूर्यचूल ही सूर्यप्रकाशावर चालते. म्हणजेच सूर्य प्रकाशाचा वापर करून या चुलीवर स्वयंपाक करता येतो. या सूर्यचूलिमुळे इलेक्ट्रिक शगडी किंवा गॅसची गरज भासत नाही. यामध्ये सोलर पिव्ही पॅनल आणि इंडोर युनिट असते. सोलर पॅनल घराच्या छतावर बसवले जाते आणि किचेन मध्ये कु्कटॉप बसवला जातो.

सूर्यचुलीचे प्रकार Solar Stove Types👈

सूर्यचुली या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला मिळतात त्या कशा असतात त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते ते आपण खालील प्रमाणे पाहूया.

  • सिंगल बर्नर सोलर कूकटॉप : या प्रकारची चूल हि छोट्या कुटुंबासाठी  पुरेशी आहे.
  • डबल बर्नर  हायब्रीड सोलर कुकटॉप : डबल बर्नर हायब्रीड सोलर हे एकाच वेळी सोलर आणि इलेक्ट्रिसिटी वर काम करू शकते. त्यामुळे ही चूल खूप महत्त्वाची आहे.पावसाळ्यात ज्यावेळेस सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात असतो त्यावेळेस आपण इलेक्ट्रिसिटी चा वापर करून ही चूल वापरू शकतो.
  • डबल बर्नर कूकटॉप : या प्रकारच्या चुली ही बऱ्याच बाजारात बघायला मिळतात.

मोफत सोलर चुलीसाठी अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मोफत सोलर चुलीसाठी अर्ज करा 👈

सूर्याचूल वापरायचे फायदे

सुर्यचूल वापरायचे अनेक फायदे आहेत ते कोणकोणते ते  खालीलप्रमाणे :-

  • सूर्यचूल सोलर कुकिंग सिस्टीम पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे म्हणजे या सुर्य चुलीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
  • स्वयंपाक करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी किंवा एलपीजी गॅस ची गरज भासत नाही यामुळे पैशाची बचत होते.
  • सदर योजनेअंतर्गत पुरवण्यात येणारे सोलर कुकिंग सिस्टम इंडियन ऑइल च्या माध्यमातून अगदी कमी किमतीमध्ये म्हणजेच दोन ते तीन हजार रुपयांमध्ये मिळते.
  • सोलर कुकिंग सिस्टम मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवू शकतो यामध्ये कुठलीही अडचण येत नाही.

सोलर कुकिंग सिस्टम हे कोणत्या कंपनीकडून पुरवल्या जातात?

सोलर कुकिंग सिस्टम इंडियन ऑइलच्या ७ अधिकृत कंपन्यांकडून पुरविल्या जातात त्या ७ कंपन्यांची नावे खालीलप्रमाणे :

  • ईशा सोलर सोल्युशन्स
  • इन्फ्रा एलएलबी
  • प्राईड उत्तम मेटल अपायन्सेस
  • पेगस पॉवर
  • जेपीएम इंडस्ट्रिज लिमिटेड
  • रेडेन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड
  • एचएफएम सोलर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड

मोफत सोलर चूलीसाठी अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा https://yojanagadi.in/land-calculated-on-mobile/#comment-6

https://iocl.com/IndoorSolarCookingSystem मोफत सोलर चुलीसाठी अर्ज करा 👈

असा करा अर्ज

सर्वप्रथम तुम्हाला खालील लिंक वर जायचे आहे https://iocl.com/IndoorSolarCookingSystem

  • लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठवर अर्ज दिसेल त्यामध्ये विचारलेली माहिती तुम्हाला भरावयाची आहे.
  • यामध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे.
  • यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे.
  • यामध्ये तुम्हाला ईमेलच्या खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला पुढील कॉलम मध्ये तुमचे राज्य निवडायचे आहे राज्य निवडल्यानंतर जिल्हा निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे.
  • तुम्ही वर्षाला किती एलपीजी वापरता या संदर्भात माहिती द्यायची आहे.
  • त्यानंतर तुमच्याकडे सोलर पॅनल साठी किती जागा उपलब्ध आहे या संदर्भात माहिती द्यायची आहे.
  • तुम्हाला किती सोलर बर्नर पाहिजे यावर टिक मार्क करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला किती सोलर कुकर पाहिजेत त्याची संख्या बाबतची माहिती लिहायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला काही अडचणी असते त्या तुम्ही त्यात नमूद करायचा आणि तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • त्यानंतर काही दिवसात तुमचे नाव यादी ला येईल.आणि इंडियन ऑइल ही कंपनी तुम्हाला मोफत असणारे सोलर सिस्टम देईल.

अशाप्रकारे तुम्ही मोफत असणारे सोलर सूर्यचूल अर्ज करू शकता.

1 thought on “लाडक्या बहिणींना आता मिळणार मोफत सूर्यचूल अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण माहिती! Free Solar Stove Scheme”

Leave a Comment